श्री. अनिल बी. तांबे
प्राचार्य
तंत्रज्ञानाची मुळाक्षरे गिरविता गिरविता विद्यार्थ्यांच्या काळजात कर्मशीलता रुजवणे व त्या माध्यमातून बलशाली राष्ट्र उभारण्याकरिता उमलत्या मनाचा विद्यार्थ्यांच्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात कौशल्य संवर्धन घडवत संपन्न नागरिक निर्माण करणे,ज्ञान आणि कर्म यांचा सुरेख संगम साधताना विद्यार्थी व शिक्षक यांना केंद्रबिंदू मानून सक्षम व कार्यक्षम आणि ज्ञान संपन्नतेच्या वाटेने जाणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मा.श्री उत्तमदादा फडतरे यांना कळंबसारख्या ग्रामीण भागामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना सन 2004 मध्ये केली.आज या संस्थेचा उत्कर्ष प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे सातत्त्याने होतो आहे आणि या संस्थेचा लौकिक एक आदर्श आणि उत्कृष्ट अशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून सर्वश्रुत आहे.
'कर्मे इशु भजावा' हा वस्तुपाठ विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला या यशाला साह्यभूत ठरविणारा शिक्षक हा सुजनशील आहे.कार्यात देव असतो,प्रयत्नात यश असते,कौशल्यात कला असते आणि विद्यार्थ्यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते.हा चिरंतन विचार संस्थेचा आहे म्हणूनच संस्थेचा गौरव कार्यशील व कर्तृत्वशील विचारांना खाद्य पुरविणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था.तंत्रज्ञानाची मुळाक्षरे गिरविणाऱ्या युवकांना संधी देणारी संस्था,सुजनशील विचारांना प्रोत्साहन व आव्हान देणारी संस्था,संकटाना समर्थपणे पेलण्याची कार्यक्षमता निर्माण करून देणारी संस्था,विद्यार्थी जीवनाला सार्थकता प्राप्त करून देणारी संस्था आणि अभ्यासू व जिज्ञासू शिक्षक वर्ग हा या ज्ञानदानात महत्वाचा घटक आनंदाने सहभागी आहे.
वर्षानुवर्षे 100 टक्के निकालाची परंपरा जोपासणारी त्याबरोबर विद्यार्थ्यांना 100 टक्के नोकरी देणारी,आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय .एस.ओ. 9001 : 2008 प्रमाणात मिळणारी महाराष्ट्रातील दुसरी संस्था.राज्य कौशल्य स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये यश मिळणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रासह भारतातील नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार.कॅम्पस इंटरव्हिव,सुसज्य सर्व सोयीसुलुक्त ग्रांथालय,विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याकरिता औद्योगिक सहली.विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीचा आढावा विद्यार्थ्यांच्या पालक मिटिंग.माफक फीमध्ये आय.बी आर.(एक्स रे वेल्डिंग) चे ट्रेनिंग. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी भव्य क्रीडा स्पर्धा या सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्सेस.निरनिराळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेऊन परिपूर्ण आणि कर्तृत्ववान विद्यार्थ्यां याच संस्थेमध्ये घडला जातो.
Developed by Incredible